शिंदे-फडणवीस-राज ठाकरे भेटीवर रुपाली पाटील यांची टीका; म्हणाल्या छुप्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे-फडणवीस-राज ठाकरे भेटीवर रुपाली पाटील यांची टीका; म्हणाल्या छुप्या...

शिंदे-फडणवीस-राज ठाकरे भेटीवर रुपाली पाटील यांची टीका; म्हणाल्या छुप्या...

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. या दीपोत्सवाचं यंदा दहावं वर्ष आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमामुळे युतीच्या चर्चांना उधाण आलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या कार्यक्रमावर कडाडून टीका केली आहे. (Rupali Patil Attack on Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde together )

हेही वाचा: राज ठाकरेंनी रात्री-अपरात्री मदतीसाठी कधीही हाक द्यावी; CM शिंदेंचं आवाहन

रुपाली पाटील म्हणाल्या की, नुकताच मुंबईत मनसेचा दिवाळी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि फडणवीस उपस्थित होते. मुळात खरचं युती झाली असेल तर ती जगजाहीर करावी. अन्यथा त्या छुप्या गोष्टी होत असतात. आमची युती आहे किंवा नाही हे सांगण्याची वेळ येणार नाही, असा टोलाही रुपाली पाटील यांनी लगावला.

हेही वाचा: मोदी आश्वासन बिहारमध्ये देतात अन् इंडस्ट्री गुजरातमध्ये सुरू करतात : प्रशांत किशोर

मुंबईतील कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणतील नव्या समिकरणाची ही नांदी असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झालं आहे.