भाजपची नजर आता त्रिपुरावर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

त्रिपुरामध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असून, येथे भाजपला एकहाती सत्ता प्राप्त होईल. 
- विक्‍टर शोम, भाजपचे प्रवक्ते 

अगरताळा- त्रिपुरामध्ये गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता भाजपने लक्ष केंद्रीय केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपशासित तीन राज्यांतील मुख्यमंत्री लवकरच त्रिपुरा दौऱ्यावर जाणार आहेत. अशी माहिती पक्ष प्रवक्ता विक्‍टर शोम यांनी दिली. 

विक्‍टर शोम म्हणाले, ""भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असून, त्याअंतर्गत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हे आगामी दोन महिन्यांत त्रिपुराचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.'' 

मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजपचे काही केंद्रीय मंत्रीही या दौऱ्यात सहभागी होणार असून, माकपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाची मोट बांधण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या कारणास्तव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 6 मे रोजी राज्याचा भेट देणार असल्याचे शोम यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: bjp prepares foTripura