भाजप करणार ‘आप’चा भंडापोड

दिल्लीतील तीनशे शाळांतील परिस्थिती मांडणार
Tejaswi Surya
Tejaswi Suryasakal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दिल्लीतील शाळांचा दर्जा सुधारल्याच्या ‘आप’सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्याची पोलखोल करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते लवकरच ३०० शाळांना भेट देऊन तेथूनच सोशल मीडियावर या शाळांच्या स्थितीचे थेट लाइव्ह प्रसारण करतील असे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सध्या दिल्लीत एकूण २४०० पेक्षा जास्त सरकारी शाळा आहेत.

दिल्लीत केंद्र सरकारने नायब राज्यपालांच्या हाती सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेतल्यापासून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण झाला आहे. दिल्लीत शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांचे सर्वाधिकार राज्य सरकारकडे आहेत व त्यावरच केजरीवाल सरकारने जोर दिला आहे. गेल्या ७ वर्षांत दिल्लीतील सरकारी शाळांचा दर्जा विलक्षण सुधारला असून या ‘दिल्ली मॉडेल’ची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यंदा दिल्लीच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ हजार २७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बेघर मुलांसाठी शाळांतच वसतिगृहांची व्यवस्था करून व त्यांच्यासाठी निवासी शाळांची सुविधा देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे.

आम आदमी पक्ष म्हणजे ‘नव्या बाटलीतील जुने कॉंग्रेसी मद्य आहे. दोन समाज, दोन राज्ये यांत फूट पाडणे हेच यांचे धोरण आहे. दिल्लीत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात फार मोठे काम केल्याचा दावा दिल्ली सरकार करत असले तरी दिल्लीतील कित्येक सरकारी शाळांची दुरवस्था झाली आहे. हीच वस्तुस्थिती आम्ही जनतेसमोर व देशासमोर मांडणार आहोत.

- तेजस्वी सूर्या, खासदार भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com