भावाने विवाह केला नाही त्यामुळे बहिण मैदानात: अमित शहा

Amit Shah
Amit Shah

गोधरा : कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा जन्मापासूनच राखीव आहे. कारण कॉंग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ता या पदाचा साधा विचारही मनात आणू शकत नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भावाने (राहुल गांधी) विवाह केला नाही. त्यामुळे आता बहीण (प्रियांका गांधी) राजकीय मैदानात उतरली आहे, असे शहा म्हणाले. 

पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहा म्हणाले, की भाजपमधील सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, तर चायवाला (मोदी) हा पंतप्रधान होऊ शकतो. भाजपमध्ये मी बूथ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलो. एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो.

मेहनतीच्या जोरावर या पदापर्यंत मजल मारली. कॉंग्रेसमध्ये असे घडू शकते का. सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो का? तेथे मात्र जन्मापासूनच पंतप्रधानपद राखून ठेवलेले आहे. भाजपमध्ये मोठ्या पदापर्यंत पोचण्यासाठी एखाद्या घराण्यात जन्म घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com