
नवी दिल्ली - भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारकडून तातडीने खुलासा मागविण्यात आला आहे. भाजप अध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेत कशी काय त्रुटी राहिली, अशी विचारणा केंद्राकडून करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या प.बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. तृणमूल कॉंग्रेसची दशकभराची सत्ता संपविण्याच्या इराद्याने पेटलेल्या भाजपने राज्यात जोरदार प्रचार सुरू केला आहे. राज्यपाल जगदीश धनकर यांनी, या हल्ल्याच्या घटनेमुळे राज्य सरकारची आपणास लाज वाटते असे, विधान केल्याने हा वाद आणखी चिघळू शकतो. या हल्ल्यावरून प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही शहा यांना पत्र लिहिले असून अराजकतेचा कळस गाठलेल्या या राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेल्याचे हे आणखी एक उदाहरण समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिषेक बॅनर्जींचा मतदारसंघ
ज्या डायमंड हार्बर येथील सभेसाठी नड्डा व भाजप नेते निघाले होते, तो मतदारसंघ खुद्द ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक यांचा आहे. नड्डा यांनी येथे येऊच नये यासाठी तृणमूल सरकारने सारे प्रयत्न केले, दगडफेकही केली असा आरोप भाजपने केला आहे. गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे दगडफेकीबद्दल तातडीने लेखी खुलासा मागविला आहे. भाजपाध्यक्षांच्या सुरक्षेत इतकी मोठी त्रुटी कशी राहिली, याचा राज्याच्या मुख्य सचिवांनी एक अहवाल देऊन खुलासा करावा, असे गृहमंत्रालयाने पत्राद्वारे कळविले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.