पुढील वर्षीच्या हजयात्रेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 

Mukhtar-Abbas-Naqvi
Mukhtar-Abbas-Naqvi

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे पुढील वर्षाच्या (२०२१) हज यात्रेबाबत सौदी अरेबियाकडून अनिश्‍चितता असली तरी भारताने मात्र यात्रेकरूंना हजला पाठविण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. हज साठी अर्ज करण्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे आणि यात्रेकरूंचा अंदाजे खर्चही कमी होणार आहे, असे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज सांगितले. यात्रेकरूंना कोरोना दोन्ही देशांच्या आरोग्य नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे बंधन असणार आहे. 

आतापर्यंत ४० हजारांहून जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. २१०० महिलांनी एकट्याने यात्रा करण्यास व ५०० महिलांनी मेहरमसाठी (बरोबर पुरुष नातेवाईकाला नेण्यासाठी) अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. नक्वी म्हणाले, की देशभरातील ठराविक विमानतळावरून कोणकोणत्या भागांतील यात्रेकरूंची विमाने सुटणार याचे नियोजन करण्यात आले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई व दिल्लीसह अहमदाबाद, बंगळूर, कोची, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकता, लखनौ, श्रीनगर या १० ठिकाणांहून हजसाठीची विमाने सोडण्यात येतील. अर्ज पाठविण्यासाठी ऑनलाइन व मोबाईल ॲपचा वापर वाढल्याचेही नक्वी म्हणाले. मुंबई व अहमदाबादहून जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रत्येकी ३ लाख ३० हजार रुपये तर दिल्ली, बंगळूर, लखनौ व हैदराबादेतील यात्रेकरूंसाठी प्रत्येकी साडेतीन लाख, कोची व श्रीनगरमधील यात्रेकरूंसाठी ३ लाख ६० हजार, कोलकत्याहून जाणारांसाठी ३ लाख ७० हजार व गुवाहाटीतील यात्रेकरूंसाठी प्रत्येकी सुमारे ४ लाख यात्रा खर्च येणार आहे. प्रवासाच्या ७२ तास आधी कोरोना चाचणी अत्यावश्‍यक असून ज्यांचे अहवाल निगेटिव्ह असतील त्यांनाच प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com