आजीच्या भेटीला जाण्यात चूक काय? राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरुन काँग्रेसचा भाजपला प्रतिप्रश्न

Congress, Former President Of Congress, Rahul Gandhi, Modi Government, KC Venugopal
Congress, Former President Of Congress, Rahul Gandhi, Modi Government, KC Venugopal

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांना समर्थन देताना मोदी सरकारवर हल्ला बोल करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधींवर भाजपच्या नेत्यांनी तोंड सुख घेतल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन असताना राहुल गांधी परदेशात गेले आहेत. यावरुन भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. 

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना चिमटा काढला होता. राहुल गांधींची भारतातील सुट्टी संपली असून ते इटलीला परत निघून गेलेत. असे ट्विट गिरीराज सिंह यांनी केले होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पक्षाच्या स्थापनादिनी परदेश दौऱ्यावर आहेत, असा उल्लेखही गिरीराज सिंह यांनी ट्विटमध्ये केला होता.    

राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगापाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आपल्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले आहेत. हे चूकीच आहे का? वैयक्तिक दौरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असे म्हणत भाजप खालच्या पातळीवरचे राजकारण करत असल्याचा टोला केसी वेणूगापाल यांनी भाजपला लगावला आहे.  28 डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस. 136 व्या स्थापना दिनी राहुल गांधी परदेशात गेल्यामुळे राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com