भाजपचा दक्षिणेत सोमय्या पॅटर्न? CM स्टॅलिन यांच्या कुटुंबाकडे १.३४ लाख कोटींच्या संपत्तीचा आरोप

mk stalin and k annamalai
mk stalin and k annamalai

चेन्नई : तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी आज 1.34 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेची एक लांबलचक यादी सार्वजनिक केली, ज्याला 'डीएमके फाइल्स' असे नाव दिले आहे.

mk stalin and k annamalai
Rahul Gnadhi :...तोपर्यंत मुंबई पाय ठेवू देणार नाही; राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यावरून बावनकुळे आक्रमक

डीएमके फाईल्स प्रसिद्ध करताना, अन्नामलाई दावा केला की ही संपत्ती मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह द्रमुकचे प्रमुख नेते दुराई मुरुगन, ईव्ही वेलू, के पोनमुडी, व्ही सेंथिल बालाजी आणि माजी केंद्रीय मंत्री एस जगथरक्षकन यांच्या मालकीची आहे.

अण्णामलाई यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की 2011 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सत्तेत असताना चेन्नई मेट्रो रेल्वेचे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीला 200 कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती. "शेल कंपन्यांद्वारे देयके दिली गेली," असा आरोप त्यांनी केला. तसेच या कंपनीची लाचखोरीबाबत अमेरिकेत चौकशी करण्यात आल्याचे सांगितले.

mk stalin and k annamalai
Maharashtra Politics : शरद पवार भाजपाजवळ जातील का? राजकारणाबद्दल प्रश्न तुमचे; उत्तरं आमची

मालमत्तेचे मूल्य मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मूल्यांकनाच्या पद्धतीचे स्पष्टीकरण देताना अण्णामलाई यांनी द्रमुक नेत्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये घोषित केलेल्या मालमत्तांचा हवाला दिला.

महाराष्ट्रातही भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अशाच प्रकारे अनेक नेत्यांवर आरोप केले. त्यापैकी काही नेते कारागृहातही गेली. तर काही नेते भाजपमध्ये गेले. मात्र आरोपींमुळे राजकारण ढवळून निघाले होते. आता तामिळनाडूतील राजकारणही ढवळून निघणार हे स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com