BJP Candidates List: सनी देओलचं तिकीट कापलं, भाजपची लोकसभेसाठी 8 वी यादी जाहीर...

BJP Candidates List: भाजपने पंजाबमधील 6 आणि ओडिशातील 3 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्वप्रथम पंजाबबद्दल बोलायचे झाले तर भाजपने सनी देओलला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून हटवले आहे.
BJP Candidates List
BJP Candidates Listesakal

BJP Candidates List

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशाच्या तीन, पंजाबच्या सहा आणि पश्चिम बंगालच्या दोन लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये मोठी बातमी म्हणजे पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दिनेश सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय अन्य पक्षांच्या खासदारांनाही तिकीट देण्यात आले आहे.

भाजपने अमृतसरमधून तरनजीत सिंग संधू यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, पक्षाने प्रनीत कौर यांना पटियाला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.

फरीदकोटमधून भाजपने हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. हंसराज हंस सध्या उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तसेच भाजपने लुधियानामधून रवनीत सिंग बिट्टू आणि जालंधरमधून सुशील कुमार रिंकू यांच्यावर बाजी मारली आहे.

BJP Candidates List
Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ

यासोबतच भाजपने ओडिशातील तीन जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये जाजपूरमधून रवींद्र नारायण बेहरा, कंधमालमधून सुकांत कुमार पाणिग्रही आणि कटकमधून भर्त्रीहरी महताब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP Candidates List
Cyber Crime: +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com