esakal | 'राजकीय करिअर संपले तरी चालेल' म्हणणाऱ्या राहुल गांधींना भाजपचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and bjp.jpg

राहुल गांधी यांचे करिअर फार पूर्वी संपलं आहे. 2019 मध्येच राहुल गांधींचा राजकीय सुर्यास्त झाला आहे, असा पलटवार भाजपने केला आहे.

'राजकीय करिअर संपले तरी चालेल' म्हणणाऱ्या राहुल गांधींना भाजपचा टोला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली-  माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण भारतीय भूभागात चीनने केलेल्या घुसखोरीबाबत मी खोटं बोलणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून भाजपने यावर तात्काळ उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांचे करिअर फार पूर्वी संपलं आहे. 2019 मध्येच राहुल गांधींचा राजकीय सुर्यास्त झाला आहे. आता ते काँग्रेस पक्षाचे भविष्य संपवण्यासाठी काम करत आहेत. या व्यक्तरिक्त आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. भारतीय नागरिक राहुल गांधीचे कोणतेही राजकीय भविष्य पाहात नाहीत, अशी टीका भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा यांनी केली आहे.

"माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही"
भारताच्या 20 जवानांनी सीमेच्या सुरक्षेसाठी आपला प्राण दिला. राहुल गांधी जवानांच्या त्यागाचा वारंवार अपमान करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात भारताचा 43,000 चौ.किमी. भूभाग चीनला गमावण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्यात थोडी जरी लाज असेल तर तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी जनतेची माफी मागावी. काँग्रेस परिवारावर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही, अशी बोचरी टीका राव यांनी केली आहे. 

चीन आणि पाकिस्तानसमोर शरणागती घेणाऱ्या पक्षाने आम्हाला सल्ला देऊ नये. राहुल गांधी वारंवार खोटं बोलत आहे. डोकलामनंतर, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमधील हवाई हल्ल्यामध्ये भारतीय जवानांनी पराक्रम दाखवला आहे. पण त्यांना हा पराक्रम दिसत नाही. जवानांचे मनोधैर्य कमी करण्याबरोबर त्यांचा अपमान गांधी करत असल्याचं राव म्हणाले. भारताचे सार्वभौमत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये सुरक्षित आहे. पंतप्रधान मोदी भारताचा इंच भूभागही चीनच्या ताब्यात जाऊ देणार नाहीत, असं राव म्हणाले आहेत.

भारताने पुन्हा दिला चीनला झटका; 47 चिनी अ‍ॅप्सवर बंदी!
दरम्यान, राजकारणाच्या दृष्टीने तुम्हाला वाटतं की मी गप बसावे. पण मी आपल्या लोकांना अंधारात का ठेवू?  मी उपग्रह छायाचित्रे पाहिली आहेत...सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी चीनच्या घुसखोरीबाबत खोटं बोलावं तर ते शक्य नाही. मी तसं करणार नाही. देशाच्या नागरिकांना सत्य कळायला हवं. मला चिंता नाही, माझे राजकीय करिअर पूर्णपणे उद्धवस्त झाले तरी झालेल, पण चीन आपल्या देशाच्या भूभागात घुसल्याबाबत खोटं बोलणार नाही. जे लोक चीनच्या घुसखोरीबाबत खोटं बोलत आहेत ते राष्ट्रवादी नाहीत, देशभक्त नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला होता.

loading image