कुमारस्वामी कर्नाटकचे 'मुख्यमंत्री की काँग्रेसच्या 'एटीएम'चे सीईओ?' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

बंगळूर : एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आणि काँग्रेसवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कुमारस्वामींवर निशाणा साधला. ते म्हणाले, एच. डी. कुमारस्वामी गांधी घराण्याच्या मागेपुढे करत आहेत. त्यामुळे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत की काँग्रेसच्या 'एटीएम'चे मुख्य व्यवस्थापक, अशा शब्दांत पात्रा यांनी कुमारस्वामींवर निशाणा साधला.

कर्नाटकातील सत्तेसाठी काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) एकत्र आले. या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्युत्तर देण्याची भाजपकडून कोणतीही संधी सोडण्यात येत नाही. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पात्रा यांनी काँग्रेस आणि जेडीएस सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सरकारमध्ये पक्षांच्या आघाडीच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढत आहे, असे म्हटले होते. सध्याच्या कर्नाटकातील वातावरणावरुन हे मत खरे होताना दिसत आहे. कुमारस्वामींवर काँग्रेसची कृपा होती. 

काँग्रेससाठी, कर्नाटक हे एटीएम आहे आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे त्यांना त्याचा मुख्य व्यवस्थापकही मिळाला आहे. याशिवाय दक्षिणेतील राज्यकारभार हा जनपथ (यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान) येथून चालविला जाईल, असेही पात्रा म्हणाले.

Web Title: BJP spokesperson Sambit Patra Criticizes Congress And Kumaraswamy