'पंतप्रधान मोदीही गांधींपासून प्रेरीत', भाजप प्रवक्त्यांनी कंगनाला फटकारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nighat Abbas-Kangana

"पंतप्रधान मोदीही गांधींपासून प्रेरीत",भाजपनं कंगनाला फटकारलं

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसेची खिल्ली उडविली होती. त्यावरून आता दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या निघत अब्बास (BJP Spokesperson Nighat Abbas) यांनी कंगनाला सुनावले आहे. अगदी पंतप्रधान मोदी (PM Modi) देखील गांधींच्या शिकवणीने प्रेरीत आहेत. त्यांच्याविरोधात अशी विधान करणे म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करणे आहे, असं म्हणत त्यांनी कंगनाची कानउघाडणी केली आहे.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता हा दर्जा देशातील जनतेने दिला आहे. ज्यांच्या आदर्शांनी देशात भारतीयता जिवंत ठेवली आहे, ज्यांच्या विचारसरणीने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रेरणा दिली आहे, असे अब्बास यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. कंगनाला निरर्थक गोष्टी बोलून काय साध्य करायचे आहे? अशा बेताल गोष्टी बोलून ती सातत्याने स्वातंत्र्यलढ्यावर प्रश्न उपस्थित करून देशाला दुखावत आहे. ती केवळ देशातील लोकांना दुखावत नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करत आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता होते आणि राहतील. भाजपलाही महात्मा गांधींपासून प्रेरणा मिळाली, असेही त्या म्हणाल्या.

कंगना नेमकी काय म्हणाली होती?

''महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा'', असं कंगना म्हणाली होती.

टॅग्स :kangana ranaut