
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पायऊतार व्हायला लावेपर्यंत आणि पक्षाला सत्तेतून बाहेर करेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ तामिळनाडुचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी घेतली. राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्यावर गंभीर असे आरोपही त्यांनी केले. गुरुवारी कोइंबतूरमध्ये एका पत्रकार परिषदेत हातात बूट दाखवत त्यांनी सर्वांसमोर राज्यातली डीएमकेची सत्ता उलथवून टाकत नाही तोवर चप्पल घालणार नाही असं सांगितलं. अन्ना युनिवर्सिटीत विद्यार्थीनींच्या लैंगिक छळ प्रकरणी सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिला.