BJP nominates Tamil Nadu leader and Maharashtra Governor C. P. Radhakrishnan as Vice President candidate : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे. माजी उपराष्ट्रपदी जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदासाठी बरेच नावही चर्चेत होते. मात्र, राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.