

8 UDP MLAs Join BJP
Esakal
देशातील आणखी एका राज्यात मोठ्या पक्षात फूट पडली असून १२ पैकी ८ आमदारांनी भाजप प्रवेश केलाय. मेघालयमध्ये सत्तेत वाटेकरी असलेल्या युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीतील आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे खळबळ उडालीय. मेघालयात भाजपचे फक्त २ आमदार होते. आता युडीपीच्या ८ आमदारांनी प्रवेश केल्यानंतर भाजपचे संख्याबळ १०वर पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भाजप खासदार संबित पात्रा, मेघालय भाजपा अध्यक्षांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.