

west bengal bjp supporter killed
Esakal
BJP Supporter Samir Ghosh: पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय भाजप समर्थकांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केलीय. बुधवारी सायंकाळी इंग्लिश बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. कार्यकर्त्याच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. समीर घोष असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे.