सुवेंदू अधिकारींनीही पैसे घेतले, त्यांना अटक का नाही?

suvendu adhikari.
suvendu adhikari.
Summary

२०१६ नारदा टेप प्रकरणाचे तक्रारकर्ता आणि वरिष्ठ पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी सीबीआयने केलेल्या कारवाईचे स्वागत केले.

कोलकाता- २०१६ नारदा टेप प्रकरणाचे तक्रारकर्ता आणि वरिष्ठ पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी सीबीआयने केलेल्या कारवाईचे स्वागत केले. त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या आधारावर तृणमूल काँग्रेसच्या सुब्रत मुखर्जी आणि फिरहाद हकीम यासारख्या नेत्यांना सीबीआयने अटक केली. असे असले तरी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात सबळ पुरावे असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नाही, याबाबत त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीच्या पुढ्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. (bjp suvendu adhikari hy cbi no arrested mathew samuel man behind narada sting operation)

शोध पत्रकार आणि नारदा न्यूजचे संस्थापक मॅथ्यु यांनी एका व्हिडिओ संदेशामध्ये म्हटलंय की, 'हा आनंदाचा दिवस आहे. खूप दिवस झाले. स्टिंग टेप २०१६ मध्ये जारी करण्यात आली होती. आरोपपत्र तीन वर्षांपूर्वीच तयार झाले होते. पण नेत्यांवर कारवाई झाली नव्हती'. 2016 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्याआधी नारदा न्यूजने टीएमसीच्या अनेक नेत्यांची व्हिडिओ क्लिप जारी केली होती. ज्यात ते पैसे घेताना दिसले होते. याला नारदा टेप्स म्हणून ओळखलं जातं.

suvendu adhikari.
"कोविडमध्ये पाण्याच्या वाफेला वैद्यकीय उपचार मानता येणार नाही"

सीबीआयने आज टीएमसीचे चार नेते सुब्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांना अटक केली. ज्यामुळे राजकारणात वादळ निर्माण झाले. स्वत: ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सीबीआयच्या कार्यालयावर दगडफेक केली. हकीम आणि मुखर्जी पश्चिम बंगालच्या नुकत्याच स्थापन झालेल्या ममतांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, तर मित्रा आमदार आहेत. चटर्जी माजी आमदार आहेत. संध्याकाळपर्यंत चारही नेत्यांना कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.

नारदा टेप्स प्रकरणात सुवेंद्र अधिकारी आणि मुकुल रॉय यांचीही नावं आहेत, यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. या नेत्यांविरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याने मॅथ्यू यांनी नाराजी व्यक्त केलीये. ते म्हणाले की, सुवेंदू अधिकारी यांनाही त्यांच्या कार्यालयात जाऊन पैसे देण्यात आले होते. सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात सबळ पुरावे होते, पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com