esakal | महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gehlot main.jpg

यावर्षी जुलै महिन्यात सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आमदारांच्या एका गटाने बंडखोरी केली होती. त्यावेळी गेहलोत सरकार संकटात आले होते.

महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर- राजस्थानबरोबर महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. भाजपने म्हटले होते की, सत्तेतून बेदखल होणारे हे काँग्रेसचे सहावे सरकार असेल, असे भाजपने म्हटल्याचे गेहलोत यांनी सांगितले. गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल केला. अमित शहा यांनी या वर्षीच्या सुरुवातीला काँग्रेस आमदारांबरोबर गोपनीय बैठक घेतली होती, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते गुलाबचंद्र कटारिया यांनी गेहलोत यांच्यावर पलटवार केला. काँग्रेसने त्यांच्या पक्षांतर्गत शांतता राखली तर ते चांगल्या पद्धतीने राज्याची सेवा करु शकतील, असा टोला त्यांनी लगावला. 

सिरोही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना गेहलोत यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावर्षी जुलै महिन्यात सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आमदारांच्या एका गटाने बंडखोरी केली होती. त्यावेळी गेहलोत सरकार संकटात आले होते. त्यावेळी आयोजित बैठकीत काँग्रेसच्या आमदारांनी ही सर्व माहिती दिल्याचे गेहलोत यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यांनी राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा- खलिस्तानचं खळं

आमदारांना सांगण्यात आले होते की, याआधी पाच सरकार आम्ही पाडले आहेत. हे सहावे सरकार असेल. गेहलोत यांनी भाजपकडून अशाच पद्धतीचे कट रचले जातात, असल्याचा आरोप केला. गेहलोत यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे कटारिया यांनी म्हटले की, काँग्रेसने आपले घर जरी सांभाळले तरी चांगले होईल. जे आपले घर शांत ठेवू शकत नाहीत, त्या दुसऱ्यावर आरोप करतात. ज्यांनी बंडखोरी केली किंवा त्या विचारात होते. त्यांनी ते कधीच संतुष्ट करु शकलेले नाहीत. 

हेही वाचा- लशींसाठी मागणी नोंदविण्यात भारत अग्रस्थानी; किती कोटी डोस मागविले पहा

दरम्यान, यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वाखाली 19 आमदारांनी दिल्ली-हरियाणा सीमेवरील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. राजस्थान सरकार पाडण्याच्या या कटात भाजप सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. सचिन पायलट यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीनंतरच हे बंड शमले होते. दोघांनी बंडखोर नेत्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. 

हेही वाचा- नव्या संसद भवनाचे भूमिपूजन १० डिसेंबरला; तब्बल एवढा खर्च आहे अपेक्षित

गेहलोत यांनी यावेळी सचिन पायलट यांच्यासाठी विश्वासघातकी शब्द वापरला होता. पायलट हे भाजपच्या साथीने काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.