लशींसाठी मागणी नोंदविण्यात भारत अग्रस्थानी; किती कोटी डोस मागविले पहा

Registration-for-Corona-Vaccine
Registration-for-Corona-Vaccine

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात येण्यासाठी अनेक देशांत लशींवर संशोधन सुरु असून बहुतेक ठिकाणी लस निर्मितीच्या टप्प्यात आहे. या घडामोडींवर भारतात लस खरेदी आणि साठवणुकीची तयारी सुरु असून आतापर्यंत लशींसाठी सर्वाधिक मागणी भारताकडूनच नोंदविण्यात आल्याची माहिती ड्यूक विद्यापीठाच्या ‘लाँच अँड स्केल स्पीडोमीटर’ या अभ्यास गटाच्या संकेतस्थळावर दिली आहे. भारताने लशींच्या १६० कोटी डोसांची आगावू नोंदणी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संकेतस्थळावरील माहितीनुसार ३० नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीत कोरोना लशींसाठी ‘कन्फर्म डोज’च्या गटात नोंदविलेल्या मागणीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित होत असलेल्या लशीसाठी भारताने मोठी मागणी नोंदविली आहे. या विद्यापीठाच्या ॲस्ट्राझेनेका या लशीचे ५० कोटी डोस भारताने आरक्षित केले आहेत. भारताएवढ्याच डोसांची मागणी अमेरिकेनेही नोंदविली आहे. याशिवाय युरोपिय समुदायासह अनेक देशांनी ‘ॲस्ट्राझेनेका’साठी नोंदणी केली आहे.

ऑक्सफर्ड - ॲस्ट्राझेनेका

  • ड्यूक विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ऑक्सफर्डची ॲस्ट्राझेनेका ही एकमात्र लस आहे जिची आगावू मागणी बहुतेक देशांनी केली आहे. 
  • ‘ॲस्ट्राझेनेका’च्या एकूण नोंदणी १५० कोटी डोसांची नोंदणी झाली आहे.
  • या लशीची चाचणी भारतात सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे.

नोव्हाव्हॅक्स

  • अमेरिकेकडून नोव्होवॅक्सची खरेदी नाही.
  • एकूण १.२ अब्ज डोसांची नोंदणी झाली.

फायझर-बायोएनटेक

  • भारताने अद्याप या लशीसाठी नोंदणी केलेली नाही.
  • एकूण ४६ कोटी डोसांची नोंदणी झाली आहे.

स्पुटनिक - ५

  • रशियातील गामालेया संशोधन संस्थेने विकसित केलेल्या या लशीचे भारताने १० कोटी डोस मागवले आहेत.
  • अन्य कोणत्याही देशांनी या लशीची मागणी नोंदविलेली नाही.
  • या लशीच्या चाचणीसाठी भारतातील हैदराबादमधील डॉ. रेड्डी संस्थेशी करार झाला आहे.

सनोफी - जीएसके

  • भारताने या लशीसाठी मागणी केलेली नाही
  • अमेरिका, युरोपिय समुदाय, कॅनडा आणि ब्रिटन या देशांनी लशीची मागणी नोंदविली आहे.

मॉर्डना

  • लशींच्या शर्यतीत मॉर्डनाही आघाडीवर आहे.
  • भारताने आतापर्यंत याचे डोस मागवलेले नाहीत.
  • अमेरिकेनेही या लशीची नोंदणी केलेली नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com