
नितीश कुमारांवर भाजपचे केंद्रीय मंत्री संतापले; म्हणाले, हिंदूंनी जावे कुठे ?
बेगूसराय : बिहारच्या बेगूसरायमध्ये होळीच्या दिवशी दोन समाजात मारहाणीची घटना घडल्या. यावरुन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. बेगूसरायमध्ये सिंह यांनी नितीश यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले, की मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भीती वाटत नाही. पण कट्टरतावादी विचारापासून भीती वाटते. बेगूसरायमध्ये दोन दिवसांत दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे गिरिराज सिंह (Giriraj Singh) जिल्हा प्रशासनावर नाराज असल्याचे दिसते. ते म्हणाले, जर बेगूसरायमध्ये ही हिंदू सुरक्षित नसेल तर तो कुठे जाईल. (BJP Union Minister Giriraj Singh Criticize CM Nitish Kumar)
हेही वाचा: 'पटेलांनी गांधीजींकडे नेहरूंना पंतप्रधान करावे अशी इच्छा व्यक्त केली होती'
जिल्हा प्रशासन रजौडा येथील घटनेतील पुरावे नष्ट करण्यात व्यस्त आहे. घटनेतील सीसीटीव्ही डिव्हीआर आदी जप्त करण्यात आले आहे. पोलिस एकतर्फी कारवाई करित आहे. पोलिसांना अधिकारी आहेत. मात्र न्यायालयही महत्त्वाचे असते. प्रशासनाचा कल एका गटाला अडचणीत आणण्याचा दिसत आहे, असा आरोप गिरिराज सिंह यांनी केला. सीसीटीव्हीचे डिव्हीआर काढण्यात आले आहे.
हेही वाचा: 'काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार'
हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, की प्रशासनआणि राज्याच्या प्रमुखांना विनंती आहे, की तुम्ही हस्तक्षेप करावे आणि न्याय मिळवून देण्याचे काम करावे. अहिंसेच्या मार्गाने लढून न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.