कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

- कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून केला जात आहे पैशांचा वापर.

अहमदाबाद : कर्नाटकातील सत्ताधारी एचडी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर केला जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) केला आहे. 

अहमदाबाद येथील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथे आले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर केला जात आहे. यापूर्वी पूर्वोत्तर भारतामध्येही त्यांच्याकडून अशाचप्रकारे सत्तांतर घडवून आणल्याचे आपण पाहिले. आताही त्याच स्वरुपाची राजकीय घडामोडी केल्या जात आहे.   

दरम्यान, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी बंडखोरी केली. या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकतील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी याबाबत भाजपवर निशाणा साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP uses money to bring down Kumarswamy Govt says Rahul Gandhi