भाजपची वेबसाईट हॅक; आयटीसेलमध्ये खळबळ

 भाजपची वेबसाईट हॅक; आयटीसेलमध्ये खळबळ

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक करण्यात आली आहे. वेबसाईट हॅक करून हॅकर्सकडून या वेबसाईटवर अश्लील छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्यानंतर ती तातडीने डाऊन करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने यावर कारवाई केली असून आता साईटवर 522 हा एरर दाखवत आहे. त्याचबरोबर वुई विल बॅक सून असे दाखवत आहे. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ही वेबसाईट हॅक करण्यात आली. वेबसाईट उघडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडिओ समोर येत होता. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचा वापर केला गेला असल्याचे निदर्शनास आले आहे. 

भाजपची वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नेटीझन्सना टिविट् करून भाजपची वेबसाईट बघण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्षाची (http://www.bjp.org/) ही अधिकृत वेबसाईट आहे. आत्तापर्यंत भाजपकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com