ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप देशभरात ऑनलाईनच सेलिब्रेशन करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ताप्राप्ती केली, त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप देशभरात आठवडाभर जोरदार सेलिब्रेशन करणार आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ताप्राप्ती केली, त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप देशभरात आठवडाभर जोरदार सेलिब्रेशन करणार आहे. मात्र कोरोना महामारीचा कहर सुरू असल्याने पक्षाचे हे सेलिब्रेशन यंदा ऑनलाईनच असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांच्या सरकारचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ३० मे २०१९ रोजी दिमाखदार सोहळ्यात पार पडला होता. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि अन्य नेते १००० ऑनलाइन (व्हर्च्युअल) पत्रकार परिषदा आणि मेळावे घेतील. याशिवाय पक्षातर्फे ७५० ऑनलाईन जाहीर सभाही घेण्यात येतील. यानिमित्ताने मोदी यांनी पक्षाच्या १० कोटी कार्यकर्त्यांना संबोधून लिहिलेले एक खास पत्रही जास्तीत जास्त देशवासियांपर्यंत पोहोचवण्यात येईल. पंतप्रधान याद्वारे आत्मनिर्भर भारतासह स्वदेशीचा आग्रह, कोरोना महामारीतून वाचण्यासाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी कायमस्वरूपी अंगी बाळगण्याचे आवाहन देशवासीयांना करणार आहेत. 

जगावर राज्य करण्यासाठी चीनचे नवे अस्त्र : डिजिटल युआन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will be celebrating all over the country for a week