'भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार; 2047पर्यंत राहणार सत्तेत'

'भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार; 2047पर्यंत राहणार सत्तेत'

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा राम माधव यांनी केला.

माधव म्हणाले की, काँग्रेसने 1950 ते 1977 अशा काळात सलग सत्तेत राहण्याचा विक्रम केला. मात्र, मोदीजी हा विक्रम तोडणार आहेत. 2047 साली भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत भाजप सत्तेत राहील. सैन्याचा आधार घेत आम्ही विजय मिळवला नाही. तर गेल्या पाच वर्षात धार्मिक अशांतता, भ्रष्टाचार रोखण्यात आम्हाला यश आलं. तसेच, मजबूत भारताची निर्मिती केली आणि आर्थिक स्थैर्य आणलं, त्यामुळे आम्हाला विजय मिळाला. असेही राम माधव म्हणाले.

त्रिपुरात लोकसभेच्या दोनच जागा आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानिमित्तच आगरतला येथे भाजपकडून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com