...तर भाजप आरक्षण संपवून टाकेल : मायावती

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आले, तर आरक्षण संपवून टाकण्यात येईल, अशी टीका केली आहे.

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आले, तर आरक्षण संपवून टाकण्यात येईल, अशी टीका केली आहे.

येथील एका जाहीर सभेत मायावती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मुस्लिम लॉ बोर्डाशी संबंधित तोंडी तलाक, समान नागरी कायदा याबाबींमध्ये भाजपचा हस्तक्षेप चिंतेचा विषय आहे.' उत्तर प्रदेशमधील विधनासभा निवडणुकीचा अंदाज वर्तविणारे बनावट सर्व्हे भाजप करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. "बनावट मतदान चाचण्यांद्वारे भाजपला अनुकूल असणारे निष्कर्ष दाखविण्यात येत आहेत. निवडणुकीनंतर भाजपचा खरा चेहरा समोर येईल. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यानुसार आरक्षण आणि अल्पसंख्यांकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा संपविण्यात येतील', अशी शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 फेब्रुवारीपासून सुरू होणारी मतदानप्रक्रिया 8 मार्चपर्यंत चालणार आहे. तर, 11 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Web Title: BJP will end reservation if it forms govt in UP : Mayawati