'80 टक्के घरांत विवेकानंदांचा फोटो लावल्यास पुढील 30 वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, कमी बोला, शांत राहा आणि आपले काम सुरु ठेवा. जर आपण जास्त बोललो तर आपली ऊर्जा नष्ट होते. आपल्याला आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. 

आगरतळा- आपल्या वक्तव्यांमुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. ईशान्य भारतातील 80 टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या विचारांचे फोटो लावल्यास पुढील तीन दशकांपर्यंत भाजपचीच सत्ता राहील, असा दावा त्यांनी केला आहे. स्वामी विवेकानंद यांचे संदेश आणि त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवून नागरिकांना प्रेरित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री देव पुढे म्हणाले की, मी माझ्या गावात पाहिलं आहे की, लोक त्यांच्या घरात कम्युनिस्ट नेते ज्योती बसू, जोसेफ स्टालिन, माओ जेडाँग यांचे फोटो लावतात. मग आपण स्वामी विवेकानंद यांचे फोटो घरात लावू शकत नाही का ? जर त्रिपुरातील 80 टक्के घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो लावला गेला तर आपले सरकार 30 ते 35 वर्षांपर्यंत टिकेल. आपल्या पक्षाचे संस्कार आणि आदर्शही कायम राहतील.

हेही वाचा- PM मोदींना काही कळत नाही हे सांगण्याची भाजपत कोणाची हिंमत नाही- राहुल गांधी

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, कमी बोला, शांत राहा आणि आपले काम सुरु ठेवा. जर आपण जास्त बोललो तर आपली ऊर्जा नष्ट होते. आपल्याला आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. 

हेही वाचा- पत्नीचे शिर हातात घेऊन चालत निघाला...

तत्पूर्वी, राज्यात ऑगस्टमध्ये कोविड-19 च्या रुग्णांना स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाटण्यात आली होती. ही पुस्तके वाचून रुग्ण मानसिकरित्या मजबूत आणि प्रेरित व्हावा यासाठी हा उपक्रम राज्य सरकारने राबवला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp Will Remain In Power If 80 Percent Houses Hang Swami Vivekanand Pictures says Tripura Cm Biplab Kumar Bev