BJP Strategy : तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला; केसीआर यांना देणार धक्का

KCR and Narendra Modi News
KCR and Narendra Modi News

नवी दिल्ली - तेलंगणात लवकर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने पुढील महिनाभर राज्यात मोठा प्रचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्रजा गोसा, भाजपा भरोसा' अशी मोहिम राबविण्याचं भाजपने ठरवलं आहे.

KCR and Narendra Modi News
Chhagan Bhujbal : माणुसकीच्या भावनेतून कर्नाटक सरकारनं..; बेळगांव सीमावादावर काय म्हणाले भुजबळ?

या अभियानांतर्गत विधानसभेच्या सर्व ११९ जागांवर ज्येष्ठ नेते सभा घेणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ केंद्रीय नेते राज्यभरात दहा मोठ्या सभा घेणार आहेत. या सभांना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी आदी संबोधित करतील.

KCR and Narendra Modi News
ShindeVsThackeray: सत्ता संघर्षाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये एका भव्य समारोप सभेला संबोधित करतील. या अभियानांतर्गत राज्यातील बीआरएस सरकारला टार्गेट केले जाणार आहे. सरकारचे अपयश जनतेसमोर ठेवले जाईल. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केसीआर सरकारला घेरण्याचं भाजपचं नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com