उत्तर प्रदेशात भाजपचा विजय निश्चित- मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

लखनौ- उत्तर प्रदेशात पाच टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानावरून असे समजते की नागरिक गेल्या पंधरा वर्षांचा राग काढत आहे. भारतीय जनता पक्षाचा येथील विजय निश्चित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

महराजगंज येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे गेल्या सहा महिन्यांपासून म्हणतात की येथे केलेले काम बोलत आहे. परंतु, अखिलेशजी तुमचे काम बोलते की कारनामे बोलतात. उत्तर प्रदेशच्या संकेतस्थळावरून माझे समर्थन होत आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांचे आयुष्य कमी होत असून, येथील परिस्थिती रेगिस्तान सारखी झाली आहे.'

नोटाबंदीचे समर्थन करताना मोदी म्हणाले, हार्वर्ड मधील काहीजण नोटाबंदीला चुकीचे समजत होते. शिवाय, अर्थव्यवस्था नष्ट होईल, असेही बोलत होते. परंतु, हार्वर्डला 'हार्डवर्क' भारी पडले आहे. 'नारळाचा ज्यूस नाही तर पाणी असते शिवाय ते मणिपूरमध्ये नाही तर केरळमध्ये असते,' असा टोला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला.

Web Title: BJP win in Uttar Pradesh, say narendra Modi