
इम्फाळ- मणिपुरमधील राज्यसभेची एकमेव जागा भाजपने जिंकली आहे. मात्र आता भाजपला राज्यातील सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण नॅशनल पीपल्स पार्टीच्या(NPP) चार आमदारांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्या असून सरकार वाचवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काँग्रेसनेही परिस्थितीचा फायदा घेत नवीन गठबंधन सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट उभारण्याची तयारी चालवली आहे. भाजपने सरकार वाचवण्यासाठी आपले संकटमोचक हेमंत बिस्व शर्मा यांना मैदानात उतरवले आहे. शर्मा यांनी रविवारी राजधानी इम्फाळला भेट दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे नेता कोनार्ड संगमा हेही उपस्थित होते. भाजप आणि एनपीपी या दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी हे दोन्ही नेते झटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
भारत - चीन संघर्षावर ट्रम्प यांचे वेट अँड वॉच
गेल्या काही दिवसांपासून एनपीपी आणि भाजपचे संबंध ताणले गेले आहेत. भाजपमधील नेते एनपीपीच्या नेत्यांचे मत विचारात घेत नाहीत. राज्यसभा किंवा लोकसभेचे उमेदवार परस्पर निवडतात, असा आरोप एनपीपी नेत्यांकडून वारंवार होत आला आहे. भाजपच्या याच हेकेखोरीला कंटाळून एनपीपीच्या चार आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला असल्याचं सांगितलं जातंय.
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
शर्मा आणि संगमा यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि आमदारांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. तसेच एनपीपीच्या आमदारांनी भाजपचे समर्थन काढून घेण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा यासाठी संगमा प्रयत्न करत आहे. मणिपुरमधील राजकीय संकट नियंत्रणात येईल याबाबत संगमा यांनी विश्वास व्यक्त केला आहे. असे असले तरी एनपीपीच्या नेत्यांनी भाजप आणि हेमंत बिस्व शर्मा यांना स्पष्ट केलं आहे की, राज्यातील नेतृत्वात बदल केल्याशिवाय ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत.
सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
काँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या असून खासदार गौरव गोगाई आणि अजय माकन यांना राज्यात कामाला लावले आहे. पक्ष सध्या 'वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत आहे. एनपीपीचे नेते पुढील काळात काय हालचाली करतात याबाबत काँग्रेस लक्ष ठेवून आहे. तसेच एनपीपीच्या नेत्यांशी बोलणी सुरु केल्याचं कळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.