मुझफ्फरनगरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

पीटीआय
बुधवार, 5 एप्रिल 2017

शहरातील खातौली परिसरात आज (बुधवार) सकाळी राजा वाल्मिकी नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - शहरातील खातौली परिसरात आज (बुधवार) सकाळी राजा वाल्मिकी नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी समितीचे माजी सदस्य असलेले वाल्मिकी हे त्यांच्या दुकानात सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाल्मिकी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत संतप्त जमावाने दिल्ली-डेहरादून रस्ता रोखला होता. काही वेळाने पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविले. परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे भाजपचे कार्यकर्ते अमित चौहान आणि मनू कुशवाह यांची हत्या करण्यात आली होती. या दोघांवरही दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनीच हल्ला केला होता.

Web Title: BJP worker shot dead in Muzaffarnagar