गुजरातमध्ये 'ईव्हीएम' आमच्या ताब्यात देऊन बघा- आप

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

नवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भाजपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला.

नवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भाजपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला.

भारद्वाज यांनी 'ईव्हीएम'मशिनमध्ये बदल करता येत असल्याचे प्रात्यक्षिक (डेमो) विधानसभेत दाखवले. यावेळी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ केला. प्रात्यक्षिकादरम्यान पाच पक्षांना प्रत्येकी दोन-दोन मते दिली व त्या पक्षांना बरोबर तेवढीच मते मिळाल्याचे दिसले. मतदानापूर्वी पोलिंग एजेंटच्या ताब्यात मशिन दिले जाते, त्यावेळी मशिन बरोबर काम करते. परंतु, खरी गंमत त्यानंतरच सुरू होते. ज्या पक्षाकडे 'ईव्हीएम' मशीनचा गुप्त कोड असतो, तोच पक्ष विजयी होतो. जस-जसे मतदान नोंदविले जाते, तस-तसे त्या पक्षाचा कार्यकर्ता गुप्त कोड रण करत राहतो व पक्षाला विजयाकडे घेऊन जातो. मतदान झाल्यानंतर कितीही सुरक्षितेमध्ये मशिन नेले अथवा ठेवले तरी पक्षाचा विजय मतदानादरम्यानच झालेला असतो.

कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केलेले भारद्वाज म्हणाले, 'भाजपवाल्यांनो तुमच्यामुळे आम्ही इंजिनिअरींग सोडले, आता तुम्चयामुळेच पुन्हा इंजिनिअरींग सुरू करत आहोत. गुजरात निवडणूकीदरम्यान मतदानापूर्वी तीन तास 'ईव्हीएम' मशिन आमच्या ताब्यात देऊन बघा, विजयी होऊनच दाखवतो. एकाही जागेवर तुम्हाला विजय मिळविता येणार नाही. कोणतेच मशिन असे नाही की त्यामध्ये बदल करता येत नाही.'

Web Title: bjp you won't win a single booth, says Saurabh Bharadwaj