

BJP’s Growth Story: From Regional Force to National Dominance
esakal
-विजय नाईक
नवी दिल्ली : केरळ, तामिळनाडू, आसाम व पश्चिम बंगाल या चार राज्यात व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभांच्या निवडणुकांचे लागलेले निकाल, भाजपच्या घोडदौडीत एकामागून एक विरोधक `चितपट’ होत आहेत, असे दर्शवितात. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी भाजपने 207 जागा जिंकून विक्रम नोंदविला. तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर `असमाधान’ मानावे लागले.