भाजपला यूपीत गाय 'मम्मी' अन् पूर्वेकडे 'यम्मी'- ओवेसी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर याठिकाणी गोमांस विक्री व वाहून नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेक विनापरवाना मांस विक्री केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

हैदराबाद - भाजप उत्तर प्रदेशात गायला मम्मी (माता) म्हणते आणि दुसरीकडे ईशान्येकडील राज्यात गाय त्यांना यम्मी (स्वादिष्ट) वाटते. यातून भाजपचा ढोंगीपणा उघड होत असल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर याठिकाणी गोमांस विक्री व वाहून नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेक विनापरवाना मांस विक्री केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यावरून राजकारण सुरु असताना आता ओवेसी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

ओवेसी म्हणाले, की उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून ते गायला गोमाता समजत आहे. दुसरीकडे ईशान्येकडील अनेक राज्यांत भाजपचे सरकार आहे. मात्र, तेथे गोमांस स्वादिष्ट म्हणून खाल्ले जाते. यातून भाजपचा ढोंगीपणा स्पष्टपणे दिसतो.

Web Title: BJP's hypocrisy is that in Uttar Pradesh Cow is mummy but in the Northeast its yummy: Asaduddin Owaisi