esakal | Delhi Election : भाजपचा पराभव झाला असला तरी...
sakal

बोलून बातमी शोधा

BJPs vote share goes high in Delhi Election

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला असला, तरी दिल्लीच्या बहुतांश भागांत भाजप उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि पक्षनेत्यांचा प्रचार शंभर टक्के अयशस्वी झाल्याचे मानण्यास भाजप नेते तयार नाहीत.

Delhi Election : भाजपचा पराभव झाला असला तरी...

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला असला, तरी दिल्लीच्या बहुतांश भागांत भाजप उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि पक्षनेत्यांचा प्रचार शंभर टक्के अयशस्वी झाल्याचे मानण्यास भाजप नेते तयार नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभेत पराभव झाला तरी भाजपच्या मतांची टक्केवारी ७० पैकी तब्बल ६३ जागांवर वाढल्याचे तर ‘आप’चा मत टक्का २०१५ पेक्षा ३८ जागांवर घटल्याचे फीडबॅक पक्षाकडे आले आहेत. त्यामुळेच मनोज तिवारींपासून साम जाजू यांच्यापर्यंतच्या दिल्लीच्या नेत्यांचे राजीनामे तातडीने न स्वीकारण्याचे पक्षनेतृत्वाने म्हणजे जेपी नड्डा नव्हे तर शहा यांनी ठरविले. त्यांच्या आदेशावरून नड्डा यांनी आज तिवारी यांच्याशी पराभवाबाबत सविस्तर चर्चा केली.

केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

आपला ४९ लाख ७४ हजार ५२२ मतदारांचा पाठिंबा मिळाला. भाजपला ३५ लाख ७५ हजार ४३० मतदारांचा. कॉंग्रेसच्या ६३ उमेदवारांनी अनामत गमावली तरी पक्षाच्या झोळीत ३ लाख ९५ हजार ९२४ दिल्लीकरांनी मतांचे दान टाकले आहे. भाजपचे बहुतांश उमेदवार निवडणूक जिंकण्यात अपयशी झाले असले, तरी बहुतांश विधानसभा जागांवर त्यांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. किमान ३० जागांवर भाजप व आपच्या विजयातील अंतर अत्यल्प आहे. २० जागांवर या टक्केवारीत किमान २० टक्के तेवढ्याच जागांवर १० टक्के वाढ झाली आहे. नझफगडमध्ये तर भाजपने २१.५ टक्के मतवाढ नोंदवली आहे. आपच्या मत टक्केवारीत ३८ जागांवर घट व ३१ जागांवर वाढ झाल्याचे दिसते. ५ जागांवर आपची टक्केवारी ८ ते १० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मुस्तफाबादमध्ये सर्वाधिक २३ टक्के वाढ आपने नोंदवली आहे. यातील करावलनगरसह २७ जागांवर आप व भाजप या दोघांचीही टक्केवारी वाढली आहे.

न्यायालयाच्या आवारातच बाँबस्फोट; तीन जखमी

आपची पॅन इंडिया योजना
२०१३ मधील विजयानंतर केजरीवाल यांनी देशभरात आपच्या विस्ताराचे स्वप्न पाहिले होते. ते स्वतः वाराणशीत जाऊन मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दिल्ली व काही प्रमाणात पंजाबच्या बाहेर आपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. नंतर २०१५ मध्ये केजरीवालांनी दिल्लीबाहेर जाणे ही आपली घोडचूक होती, हे जाहीरपणे मान्य करून दिल्लीकरांची माफी मागितली. आता सलग तिसऱ्या वेळेस केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर मात्र आपने पक्षाच्या देशभरातील विस्ताराची योजना गंभीरपणे आखणे सुरू केल्याचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर विश्‍वास असलेल्या विविध राज्यांतील समविचारी पक्षांबरोबर आप नेतृत्व लवकरच चर्चा सुरू करून त्या त्या राज्यांत जनाधार वाढविण्याची योजना अमलात आणेल, असे त्यांनी सांगितले.