ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणाऱ्यास 11 लाखाचे बक्षीस; भाजयुमो नेत्याची घोषणा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणाऱ्या अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका नेत्याने केली आहे.

अलिगड (उत्तर प्रदेश) - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका नेत्याने केली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "जो कोणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शिर कापेल आणि घेऊन येईल, त्याला मी अकरा लाख रुपयांचे बक्षीस देईल. सरस्वती पूजन, राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना ममता बॅनर्जी कधीही परवानगी देत नाहीत. लोकांवर लाठीमार करण्यात येतो आणि त्यांना निर्दयपणे मारण्यात येते. त्या नेहमी इफ्तार पार्टी आयोजित करून मुस्लिमांना पाठिंबा देतात.'

ब्रिभूम जिल्ह्यातील सुरी येथील वीर हनुमान जयंती आयोजकांनी हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी रॅली काढू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते. रॅलीरदरम्यान शस्त्रे बाळगण्यात येणार नाहीत असे म्हणत रॅलीला परवानगी देण्याची विनंती आयोजकांनी केली होती. मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम होते. तरीही मंगळवारी पश्‍चिम "जय श्री राम'च्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी रॅलीवर लाठीमार केला.

अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे लाठीमाराच्या घटनेवर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत असल्याचा दावा वार्ष्णेय यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केला आहे.

Web Title: BJYM leader offers reward of Rs.11 lakh for Mamata Banerjee's head