काळ्या बुरशीने दिल्लीतही मारली धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Black Fungs

काळ्या बुरशीने दिल्लीतही मारली धडक

नवी दिल्ली - कोरोनापाठोपाठ आलेल्या काळी बुरशी (ब्लॅक फंगस) (Black Fungs) या आजाराने (Sickness) दिल्लीलाही (Delhi) धडक दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज एक बैठक घेऊन याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. तसेच या आजारावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅम्फोटेरिसीन-बी या इंजेक्शनच्या (Injection) वापरासाठी एक तज्ञ समिती नेमण्यात आली. डॉ. एम. के. डागा हे या समितीचे अध्यक्ष असतील त्यामध्ये डॉ. मनीषा अग्रवाल, डॉ. एस. अनुराधा आणि डॉ. रवी मेहेर यांचा समावेश असेल. (Black Fungs in Delhi Sickness)

दिल्लीकरांकडून आता काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. सध्या राजधानीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. केंद्राने १ लाख इंजेक्शन तातडीने दिल्लीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ऑक्सिजन टंचाईच्या काळात अनुभवलेला काळाबाजार रोखण्यासाठी ही तज्ञ समिती समन्वय ठेवण्याचे काम करेल, असेही सांगण्यात आले.ज्या रुग्णालयांना अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनची आवश्यकता असेल त्यांनी या समितीकडे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. सुरवातीच्या काळातच हा घातक आजार रोखणे आवश्यक असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी झालेल्या चुकांमधून धडा घेण्याची वेळ आली आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.

हेही वाचा: VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'

दिल्लीत दररोज आढावा घेणार

इंजेक्शनसाठी किती अर्ज आले? केंद्राकडून किती डोस मिळाले? आणि आलेल्या अर्जांपैकी किती रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा झाला याचा वारंवार आढावा घेण्यासाठी दर दिवसाआड सकाळी दहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते पाच या काळात समितीच्या बैठका होतील. प्रत्यक्ष किंवा डिजिटल म्हणजेच ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या या बैठकांना दिल्लीचे आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यापैकी कोणीतरी एक जण नियमितपणे हजर राहील.

लेखापरीक्षण होणार

इंजेक्शन वितरणाची जबाबदारी दिल्ली आरोग्य यंत्रणा म्हणजेच डीजीसीएस यांच्याकडे राहील असेही स्पष्ट करण्यात आले. वितरणासाठी कोणतीही प्रतिक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट नसेल. रुग्णालयांनी इंजेक्शनचे किती डोस? कोणत्या रुग्णांना दिले? त्याची सविस्तर माहिती त्यांना रोजच्या रोज सरकारला कळवावी लागेल. केंद्राकडून अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनचा होणारा पुरवठा आणि त्याचे लसीकरण याबाबत लेखापरीक्षण केले जाईल ,असेही दिल्ली सरकारने जाहीर केले.

loading image
go to top