esakal | धक्कादायक! फक्त 18 महिन्याच्या बाळाला ब्लॅक फंगस
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बिकानेरमधील प्रत्येकी दुसरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत होती. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

धक्कादायक! फक्त 18 महिन्याच्या बाळाला ब्लॅक फंगसची लागण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागताच काळ्या बुरशीने (Black Fungus) आपले पाय रोवण्यास सुरवात केली. काही दिवसातच काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण झपाट्याने वाढू लागले. ही गोष्ट लक्षात घेत काही राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित केलं आहे. सुरवातीला कोरोनाग्रस्तांमध्ये आढळणारा ब्लॅक फंगस आता सर्व वयोगटातील सामान्य माणसांनाही होत असल्याचे दिसून येत आहे. (black fungus confirmed in one and half year old child in Bikaner)

राजस्थानच्या बिकानेरमधील एका दीड वर्षाच्या बाळाला ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. चिमुकल्याच्या नाकाजवळ काळा डाग दिसू लागल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्याला ब्लॅक फंगस झाल्याचे निदान झाले. स्टेरॉइडच्या वापरामुळे ब्लॅक फंगस होतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र या घटनेने या सर्व शक्यतांना तडा दिला आहे.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

याबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले की, 'स्टेरॉइड हा कॅन्सग्रस्तांवरील उपचाराचा एक भाग आहे. बीकानेरच्या पीबीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या या चिमुकल्याला एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया आजार आहे. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. सात दिवसांपूर्वी भरती केलेल्या या चिमुकल्याला कॅन्सर वॉर्डमधून ब्लॅक फंगस वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं असून एम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनचे उपचार सुरू करण्यात आले आहेत.'

कॅन्सर विशेषज्ञ डॉ. सुरेंद्र बेनीवाल म्हणाले की, 'ब्लॅक फंगसची लागण किती खोलवर झाली आहे, हे तपासण्यासाठी एमआरआय काढण्यात आला आहे. एमआरआयचा अहवाल आल्यानंतर शस्त्रक्रियेबाबत विचार करण्यात येईल. हा चिमुकला ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा रुग्ण ठरला आहे.'

हेही वाचा: कोविशील्ड-कोवॅक्सिन लसीचं कॉकटेल; UP मधील गावात खळबळ

दरम्यान, बीकानेरमध्ये आतापर्यंत ब्लॅक फंगसचे ७ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनाचे २३३ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बिकानेरमधील प्रत्येकी दुसरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत होती. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.