esakal | रेमडेसिव्हीर इंजेक्शन म्हणून विकलं जातंय खारंं पाणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर इंजेक्शन म्हणून विकलं जातंय खारंं पाणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
रेमडेसिव्हीर इंजेक्शन म्हणून विकलं जातंय खारंं पाणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
sakal_logo
By
टीम इ सकाळ

म्हैसूर : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. प्रतिदिन जवळपास अडीच लाखांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण भारतात आढळत आहेत. तसेच कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. तर दुसरीकडे या परिस्थितीचा गैरफायदा देखील घेतला जात आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले रेमेडीसिव्हीर या औषधाची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, या औषधाचा सध्या तुटवडा जाणवत आहे. औषधाच्या वाढत्या मागणीमुळे अनेक ठिकाणी या औषधासाठी रांगाच्या रांगा लागत असल्याची परिस्थिती आहे. या औषधावाचून अनेक रुग्णांचा प्राण जात असल्याच्या घटना घडत आहेत. या औषधासाठी सध्या मेडीकलसमोर मोठमोठाल्या रांगा लागल्याचं चित्र आहे. तर ते न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे हंबरडे ऐकू येत आहेत. एकीकडे ही दुर्दैवी परिस्थिती असताना हे औषध चढत्या भावाने विकलं जात असून त्याची साठेबाजी आणि काळाबाजार देखील होत असल्याच्या घटना घडत आहेत. प्राप्त परिस्थितीत देशाला या औषधाची गरज सर्वांत जास्त आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने आता रेमेडेसिव्हीर औषधाची परदेशातील निर्यात थांबवली आहे. देशातील परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, या रेमडेसिव्हीरबाबत कर्नाटकातून अशी एक घटना समोर आलीय, जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका नर्सला रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बाटलीमध्ये खारं पाणी आणि एँटीबायोटीक्स मिसळून विकण्याच्या आरोपाखाली अटक केली गेलीय.

हेही वाचा: कोरोना बाधितांसह कुटुंबाला हवा मानसिक आधार

हेही वाचा: Breaking - राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

कोरोनाविरोधात एका बाजूला लढा सुरु असताना या लढाईत जीवनावश्यक मानलं जाणारं रेमडेसिव्हीर या औषधाला सध्या प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच याचा काळाबाजार देखील मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातूनच ही कारवाई केली गेली आहे. म्हैसूनचे पोलिस कमिश्नर चंद्रगुप्त यांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळाबाजाराचा मास्टरमाइंड गिरिश नावाचा एक व्यक्ती होता, जो एक नर्स आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिव्हीर औषधांच्या बाटल्यांना रिसायकल करुन एँटीबायोटीक्स आणि सलाईनने भरुन ते बाजारात विक्रीसाठी नेण्यात आलं. तो 2020 पासून हा प्रकार करत होता. गिरिशने असा खुलासा केलाय की तो आपल्या साथीदारांसह गेल्या वर्षीपासून हा काळाबाजार कर त आहे. त्याला त्याच्या साथीदारांसह आता अटक करण्यात आली आहे. गिरिश जेएसएस हॉस्पिटलमधील स्टाफमध्ये नर्स म्हणून तैनात होता.