ओडिशाच्या सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये आढळला काळा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Black tiger

ओडिशाच्या सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये आढळला काळा वाघ

तुम्ही पांढरे आणि पिवळ्या रंगाचे वाघही अनेक वेळा जवळून पाहिले असतील, पण जर तुम्हाला सांगितल की काळ्या रंगाचा पण वाघ असतो तर विश्वास नाही बसणार पण होय हे खंर आहे. ओडिसा राज्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुर्मिळ काळा वाघ तो प्रथम झाडाभोवती फिरून पाहते. यानंतर तो दोन्ही नखांनी झाडावर खुणा करतो मग तेथून तो जातो.

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 42.7 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर यूजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

या व्हिडिओमध्ये दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ परिसरात दिसल्याने पर्यटक पाहण्यासाठी गर्दी करतात. 2007 मध्ये पहिल्यांदा या जातीचे वाघ सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात दिसले होते.

टॅग्स :Odishatigerviral video