
शोपियानमध्ये भाड्यानं घेतलेल्या एका खासगी वाहनात स्फोट झालाय.
Indian Army : लष्कराला घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनात स्फोट; 3 जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये (Shopian Jammu and Kashmir) झालेल्या स्फोटात तीन जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिलीय. एका अधिकृत निवेदनात म्हटलंय की, हा स्फोट एका खासगी वाहनात झालाय. सध्या जवानांना (Indian Army) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरूय.
काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Police) पहाटे केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की, 'शोपियानमध्ये भाड्यानं घेतलेल्या एका खासगी वाहनात स्फोट झाला. तीन सैनिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या स्फोटाचं नेमकं कारण तपासण्यात येत आहे.'
हेही वाचा: जगातला सर्वोत्तम अभियंता म्हणत वीज कार्यालयात लावला ओसामा बिन लादेनचा Photo
काल (बुधवार) संध्याकाळी शोपियान जिल्ह्यात (Shopian District) दहशतवाद्यांनी एका नागरिकाला गोळ्या घालून जखमी केलं होतं. ही घटना शोपियान जिल्ह्यातील कीगममधील राख-चिद्रेन गावात घडली. एक दिवसापूर्वी कुलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रजनी बाला या 36 वर्षीय शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती.
Web Title: Blast In Jammu And Kashmir Shopian 3 Soldiers Injured Kashmir Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..