दहशतवाद्याकडून स्फोट, गोळीबार सुरूच

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

बांगलादेशच्या सिल्हेट शहरात काल दोन स्फोटात सहा जण मृत्युमुखी आणि चाळीस जण जखमी झालेले असताना दहशतवाद्याच्या ताब्यात असलेल्या इमारतीत आज सकाळी स्फोट झाले. त्याठिकाणी बेछूट गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ढाका - बांगलादेशच्या सिल्हेट शहरात काल दोन स्फोटात सहा जण मृत्युमुखी आणि चाळीस जण जखमी झालेले असताना दहशतवाद्याच्या ताब्यात असलेल्या इमारतीत आज सकाळी स्फोट झाले. त्याठिकाणी बेछूट गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सिल्हेट शहरातील आत्मघाती हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो, असे ममता यांनी म्हटले आहे.

दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या अतिया महाल नावाच्या पाच मजली कॉम्प्लेक्‍स परिसरात आज सकाळी स्थानिक वेळेनुसार दहाच्या सुमारास तीन स्फोट झाले. त्याचवेळी गोळीबाराचा प्रचंड आवाजही ऐकू आला. कॉम्प्लेक्‍समध्ये किती दहशतवादी घुसले होते, याबाबत आताच माहिती सांगता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर मेजर जनरल अनवरुल मोमेन यांच्या नेतृत्वाखाली "

ट्‌वायलाइट' नावाचे ऑपरेशन सुरू केले आहे. यात दहशतवादविरोधी पथक आणि "स्वात'नावाचे पोलिस पथक सहभागी झाले आहेत. जेएमबीचा म्होरक्‍या मुसा आणि अन्य काही दहशतवादी सिल्हेटमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख मोनीरुल इस्लाम यांनी काल सांगितले होते.

Web Title: Blast from terrorist; firing continues