अंध मुस्लिम दाम्पत्याला बोलण्यास भाग पाडले 'जय श्रीराम'

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

अंदालमध्ये काही तरुणांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझी टोपी खेचली. तुम्ही मुस्लिम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला, असे सांगत त्या तरुणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. माझ्या पत्नीने विनवणी केली. पुन्हा या भागात येणार नाही, असेही सांगितले. मात्र, यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरुच ठेवली. मी आंधळा असून फक्त भीक मागण्यासाठी आलो. मी कोणालाही त्रास देत नाही. मला जाऊ द्या असे सांगूनही ते थांबले नाहीत.

कोलकता : हिंदू बहुल भागात प्रवेश केला आणि माझा एवढाच दोष होता की मी मुस्लिम आहे. त्यांनी मला जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले हे सर्व कथन केले आहे एका अंध मुस्लिम दाम्पत्याने. 

पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील अंदल भागात राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. अंध असलेले 67 वर्षीय अबूल बशर हे पत्नी बेदनाबीबी (वय 61) भीक मागण्यासाठी हिंदू बहुल भागात गेल्यानंतर त्यांच्याबाबत ही घटना घडली. पाणावलेल्या डोळ्यांसह त्यांनी या घटनेचे कथन केले. त्यांची पत्नीही अंध आहे. 

या अंध दाम्पत्याला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम आणि जय माँ तारा असा जयघोष करण्यास भाग पाडले. पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि राणीगंज येथे रामनवमीच्या यात्रेवरुन दंगल झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. बशर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. 

बशर यांनी सांगितल्यानुसार, अंदालमध्ये काही तरुणांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझी टोपी खेचली. तुम्ही मुस्लिम असूनही हिंदूबहुल वस्तीत प्रवेश केला, असे सांगत त्या तरुणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. माझ्या पत्नीने विनवणी केली. पुन्हा या भागात येणार नाही, असेही सांगितले. मात्र, यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरुच ठेवली. मी आंधळा असून फक्त भीक मागण्यासाठी आलो. मी कोणालाही त्रास देत नाही. मला जाऊ द्या असे सांगूनही ते थांबले नाहीत. त्या तरुणांनी आम्हाला ‘जय श्रीराम, जय माँ तारा’ असे बोलण्यास भाग पाडले. जर ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला नाही तर ठार मारु अशी धमकी त्या तरुणांनी आम्हाला दिली. 

Web Title: blind Muslim couple made to chant Jai Shri Ram in West Bengal