

Bharuch Factory Boiler Blast
ESakal
गुजरातमधील भरूच येथील एका औषध कारखान्यात मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरात औद्योगिक विकास महामंडळ (GIDC) च्या सायखा परिसरातील औषध कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. या अपघातात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर सुमारे २० जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य पूर्ण केले आहे.