Amol Palekar : अमोल पालेकर सपत्नीक भारत जोडो यात्रेत समील; राहुल गांधींनी मानले आभार

Bollywood actor amol palekar joins congress bharat jodo yatra rahul gandhi share photos
Bollywood actor amol palekar joins congress bharat jodo yatra rahul gandhi share photos

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात शेवटचा टप्पा सुरू आहे. यादरम्यान चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. स्वतः राहुल गांधींनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. देशाचा आवाज उंचवल्याबद्दल धन्यवाद, असे म्हटले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ७० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात दरम्यान, अमोल पालेकर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. अमोल पालेकर 'भारत जोडो यात्रे'मध्ये त्यांच्या पत्नीसोबत दाखल झाले होते. बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन, पूजा भट्ट यांचाही यात्रेत सहभाग नोंदवला आहे.

Bollywood actor amol palekar joins congress bharat jodo yatra rahul gandhi share photos
Devendra Fadanvis: छत्रपतींचा अवमान झाल्याचं फडणवीसांना अमान्य; म्हणाले, 'सुधांशू त्रिवेदी...'
Bollywood actor amol palekar joins congress bharat jodo yatra rahul gandhi share photos
IND vs NZ 2nd T20: अजून एक व्हिडिओ गेमवाली खेळी! विराटने सूर्याची खेळी पाहून केले ट्विट

राजकीय पाठिंब्यासोबतच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आता मनोरंजन जगताचाही पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी या अभिनेत्रीही राहुल गांधी यांच्या सोबत यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

तसेच अभिनेता सुशांत सिंग हा देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रेत' सहभागी झाला होता, त्यांने ट्विटरवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मला वाटले हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे, मी याला उपस्थित राहावे की नको. पण नंतर लक्षात आले की हा भारताचा प्रवास आहे, जो देश एकसंध असल्याचे दर्शवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com