esakal | Bihar Election: तेजस्वी समर्थकांनी हातात घेतले 'मासे'; घरासमोर केली गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

RJD Totka.

सध्या निकालाचे कल स्पष्ट नाहीयेत मात्र समर्थकांना आशा आहे की तेजस्वी यादवच मुख्यमंत्री  बनतील.

Bihar Election: तेजस्वी समर्थकांनी हातात घेतले 'मासे'; घरासमोर केली गर्दी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सुरवातीला मतमोजणीच्या कलांमध्ये तेजस्वी यादव यांच्या गठबंधनने आघाडी घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या एनडीएनी आघाडी घेतली आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि पक्षाच्या मनाईनंतरही त्यांच्या घरासमोर समर्थकांची गर्दी जमा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हातात मासे घेऊन त्यांच्या घरासमोर गर्दी केलीय. सध्या निकालाचे कल स्पष्ट नाहीयेत मात्र समर्थकांना आशा आहे की तेजस्वी यादवच मुख्यमंत्री  बनतील.

हेही वाचा - Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

तेजस्वींच्या घरासमोर सकाळपासूनच राजदचे समर्थक जमा होऊ लागले आहेत. राजधानी पाटनामधूनच नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यातूनही लोक त्यांच्या घरासमोर गर्दी करत आहेत. त्यांचे जुने फोटो हातात घेतलेले समर्थक घराबाहेर आहेत. तेजस्वी यादव हे क्रिकेटपटू देखील आहेत. ते दिल्ली डेअरडेव्हील्स या संघासाठी आयपीएल खेळायचे. समर्थकांचं म्हणणं आहे की ते तेजस्वी यादव यांना त्यांचे हे जुने फोटो भेट द्यायला आलेले आहेत. 

तर तेजस्वी यांच्या काही समर्थकांनी हातात मासे घेऊन आले आहेत. मोठमोठ्या माशांना आपल्या गाड्यांमधून त्यांनी आणलं आहे. कारण माशांना शुभ मानलं जातं. म्हणूनच या निवडणुकीत शुभ घडावं आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री व्हावेत या उद्देशाने समर्थकांनी हातात मोठे मासे घेतले आहेत. समर्थकांचं म्हणणं आहे की मासा हा विष्णूचा अवतार आहे.

हेही वाचा - Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा
हाजीपूरमधून आलेल्या राजद नेते केदार यादव यांनी म्हटलं की, आम्ही 2015 मध्येही असे मासे घेऊन आलो होतो. तेंव्हा राजद सत्तेत आली होती. निकाल स्पष्ट झाल्यावर आम्ही माशांना घेऊन लालू प्रसाद यादव यांच्या घरात जाऊ. त्यानंतर सर्व लोक त्याचे दर्शन घेतील. या साऱ्या गोष्टीमुळे तेजस्वी यादव यांच्या घरासमोर गर्दी वाढताना दिसत आहे.