PM मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवलाय, काही तासातचं; सात वेळा फोन करुन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ
PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने केला. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्रीचा हा प्रकार आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये फोनवरुन एकामागून एक सात बॉम्ब ठेवल्याच्या सूचना मिळाल्या.

निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा फोन करणारा करत होता. तातडीने पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले. निवासस्थानी कसून शोध घेण्यात आला. मात्र बॉम्ब कुठेही आढळला नाही.

LIVE Update : राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून हा फोन करणाऱ्याचा शोध सुरू होता. अखेर या आरोपीचा मोबाईल नंबर सापडला, त्याला ट्रॅक करून पकडण्यात आलं. दिल्लीच्या दयालपूर भागातला हा रहिवासी असल्याचं उघड झाले आहे. रवीद्र तिवारी असं त्याचं नाव आहे.

तिवारीचा मोठा भाऊ तीन वर्षे बेपत्ता आहे. त्याची पत्नी माहेरी असते. ती त्यांच्या मुलीला भेटून देत नाही. तसेच पत्नीचे इतर व्यक्तीशी संबंध आहेत. या सर्वबाबतीत पोलीस काहीच करत नसल्याने त्याने खळबळ उडवून देण्यासाठी हा कॉल केल्याच सांगण्यात येत आहे.

Delhi LNJP hospital : दिल्लीतील बड्या रुग्णालयात घडला लाजीरवाणा

फोन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याबाबत पावले पोलिसांकडून उचलण्यात आली आहेत. त्याच्या तक्रारीचे पोलीस दखल घेत नव्हते, म्हणून आपण हे पाऊल उचल्याचे या फोन कॉल तिवारीने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com