भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरला सीबीआयने ताब्यात घेतले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

लखनऊ -  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर याला ताब्यात घेतले आहे. 

लखनऊ -  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर याला ताब्यात घेतले आहे. 

कुलदीप सिंह त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने पहाटे 4.30 वाजता ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या लखनऊ कार्यालयात कुलदीप सिंह सेनगरची चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंडविधानानुसार कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. 

या बलात्कार प्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  

दरम्यान, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलिसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला देखील उन्नाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंह व अतुलसिंह या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.

Web Title: Booked for rape, CBI detains Unnao MLA Kuldeep Singh Sengar