UP: दलित असल्याने लग्नासाठी सभागृह देण्यास नकार; संचालकाविरोधात एफआयआर

Marriage
Marriagesakal

मेरठ - जिल्ह्यातील खरखौदा भागातील पोलिसांनी मॅरेज पॅव्हेलियनच्या ऑपरेटरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लग्नासाठी मंडप बुक करणारे वाल्मिकी (दलित) जातीचे असल्याचे समजताच मंडप चालकाने बुकिंग रद्द केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Marriage
Sharad Pawar : 'हिंडेनबर्ग' प्रकरणात जेपीसीची मागणी निरर्थक', पण... ; शरद पवार यांचं मोठं विधान

परिमंडळ अधिकारी (सीओ) रुचिता चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, जयदीप नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून आरोपी मंडप ऑपरेटर रईस अब्बासी विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा आणि संबंधित कलमान्वये कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे खरखौदा पोलिस ठाण्याचे म्हणणे आहे की, लग्न ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी होईल. मंडप चालकाला याची माहिती देण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात येत आहे.

Marriage
Ajit Pawar News : पुणे दौरा अर्धवट सोडून अजित पवार गेले कुठे? या पूर्वीही…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीपच्या बहिणीचे ९ एप्रिल रोजी लग्न होणार असून लग्नाची मिरवणूक शेजारच्या गाझियाबाद येथून येणार आहे. सूरजकुंड येथील रहिवासी जयदीप हा महापालिकेत सफाई कामगार आहे. जयदीपने दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी दहा हजार रुपये जमा करून हापुड रोडवर गोल्डन फार्महाऊस बुक केले होते. ५ एप्रिल रोजी पॅव्हेलियन ऑपरेटर रईस अब्बासी यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांचे बुकिंग रद्द केले. तसेच वाल्मिकी जातीचे कारण देत दुसऱ्या ठिकाणी लग्न आयोजित करण्यास सांगितले.

दुसरीकडे अब्बासी यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, "मी कार्यक्रमस्थळी केवळ मांसाहारी स्वयंपाकाला विरोध केला. मी कधीही कुणाला जातीशी संबंधित काही बोललो नाही किंवा बुकिंग रद्द केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com