इस्त्रोच्या सर्वाधिक वजनदार 'जीसॅट-11' उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11चे प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. सुमारे पंधरा वर्षांचे आयुष्य असलेल्या जीसॅट-11 उपग्रहाचे वजन पाच हजार 854 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह देशभरात ब्रॉडबॅंड सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. जीसॅट-11 हा इस्रोने निर्मिती केलेला सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे.

बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे आज (बुधवार) पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले गेले. 

 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11चे प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. सुमारे पंधरा वर्षांचे आयुष्य असलेल्या जीसॅट-11 उपग्रहाचे वजन पाच हजार 854 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह देशभरात ब्रॉडबॅंड सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. जीसॅट-11 हा इस्रोने निर्मिती केलेला सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे. या उपग्रहाचे 25 मे रोजी प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही अतिरिक्त तांत्रिक तपासण्यांसाठी त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. आज अखेर याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.

आज पहाटे फ्रेंच गयानातून भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2.07 मिनिटे ते 3.23 मिनिटांच्या दरम्यान अवकाशात पाठविण्यात आला. दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणारा जीसॅट-11 हा नव्या पिढीतील उपग्रह मानला जातो. एरियना-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11 आणि कोरियन अवकाश संशोधन संस्थेच्या "जीईओ-केओएमपीएसएटी-2ए' या उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.

Web Title: Boost to net connectivity Isro successfully lifts off heaviest satellite Gsat-11