माझा तिच्यावर बलात्कार करून झालाय; तुम्ही पण या...

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

माझा प्रेयसीवर बलात्कार करून झाला आहे, तुम्ही पण या, असा फोन करून त्याने दोन मित्रांना बोलवले. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शिवाय, ब्लेडने जखमी केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बिलासपूर (छत्तीसगड): माझा प्रेयसीवर बलात्कार करून झाला आहे, तुम्ही पण या, असा फोन करून त्याने दोन मित्रांना बोलवले. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शिवाय, ब्लेडने जखमी केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 22 वर्षीय युवतीचे मासूम बेग नावाच्या युवकाशी काही वर्षांपासून प्रेमसबंध होते. युवती कॉल सेंटरमध्ये काम करत आहे. दोघे अनेकदा भेट होते. प्रियकराने तिला एका ठिकाणी भेटायला बोलवले. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने शशिकांत व राकेश नावाच्या मित्रांना बोलावून घेतले. दोघांनी तिला मैत्रिणीच्या घरी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले व अज्ञात ठिकाणी नेले. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शिवाय, ब्लेडने जखमी करून निघून गेले. पीडित युवतीने मैत्रिणीला झालेला प्रकार सांगितला. मैत्रिण घटनास्थळी आल्यानंतर दोघी पोलिस चौकीत गेल्या. सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. शिवाय, युवतीला रुग्णालयात दाखल केले. शशिकांत वैष्णव (वय 26), राकेश साहू (वय 19) या दोघांना अटक केल्यानंतर प्रियकर मासूमलाही अटक करण्यात आली. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पीडीत युवतीने पोलिसांना सांगितले की, 'प्रियकर आणि मी अनेकदा भेटत होतो. प्रियकराने मला अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार केला. बलात्कारनंतर त्याने दोन मित्रांनाही बोलावून घेतले. त्या दोघांनीही जखमी करत सामूहिक बलात्कार केला. तिघांनी मिळून अगोदरच काटकारस्थान रचले होते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy friend and his two friend gangraped in chhattisgarh